१ जानेवारी २०२३ पासून होणार महत्त्वाचे बदल! सामन्यांच्या खिशावर होणार परिणाम?

139

डिसेंबर महिना संपायला आता शेवटचे काही दिवस बाकी राहिले आहेत. २०२३ या नववर्षात काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. या नियमांचा सामान्यांच्या जीवनावर सुद्धा परिणाम होणार आहे. नवीन वर्षात नव्याने लागू होणाऱ्या नियमांचा बजेटवर काय परिणाम होणार कोणते बदल होणार जाणून घेऊया…

( हेही वाचा : श्रद्धा वालकर प्रकरणी विशेष पोलीस पथकामार्फत चौकशी करणार; फडणवीसांची विधानसभेत घोषणा)

क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल

२०२३ मध्ये क्रेडिट कार्डाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे रिवार्ड पॉईंट्स हे नवीन वर्षांआधी रिडेम करून घ्या. १ जानेवारीपासून काही बॅंकांच्या रिवॉर्ड पॉईंटमध्येही बदल होणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्येच रिवॉर्ड पॉईंट रिडेम करा.

पॅन-आधार लिंक

जर तुम्ही पॅन-आधार लिंक केले नसेल तर त्वरीत करून घ्या. आयकर विभागाने पॅन-आधार लिंक करण्याची मुदत एप्रिलपर्यंत वाढवली आहे. परंतु तुम्ही वेळेत लिंक प्रक्रिया पूर्ण केल्यास बॅंकिंग व्यवहारात अडचणी येऊ शकतात.

विमा प्रिमियम महागणार?

नववर्षात २०२३ मध्ये विमा प्रिमियम ( Insurance Premium ) महागण्याची शक्यता आहे. काही कंपन्यांकडून नव्या वर्षात नवीन नियम लागू करण्यात येण्याची शक्यता आहे.

CNG आणि PNG किंमतींमध्ये बदल

नवीन वर्षात सीएनजी आणि पीएनजीचे दर बदलण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून दर महिन्याच्या १ तारखेला नवीन किंमती जारी केल्या जातात. नव्या वर्षात पेट्रोलियम कंपन्यांकडून कोणते नवे दर जारी केले जातात याकडे सामन्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.