जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र व राज्य शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. पीएम किसान गरीब कल्याण अन्न योजना (Pradhanmantri Garib Kalyan Yojana) अंतर्गत देशातील 80 कोटी लोकांना दरमहा 5 किलो गहू मोफत दिले जाते. याशिवाय कार्डधारकांसाठी राज्य सरकारकडून सर्व प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत.
हरियाणा सरकार राज्यातील 29 लाख दारिद्रय (बीपीएल) रेषेखालील कुटुंबांना नवीन वर्षात पिवळे रेशन कार्ड भेट देणार आहे. सर्व लाभार्थ्यांना हे पिवळे रेशन कार्ड ऑनलाइन दिले जाणार असून नव्या वर्षाच्या पूर्वीच सरकार बीपीएल कुटुंबीयांना ही सुविधा देणार आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर एका क्लिकवर त्यांचे वितरण करणार आहे. याशिवाय, सरकारने बीपीएल कार्डसाठी किमान वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांवरून 1.80 लाख रुपये केले आहे.
(हेही वाचा – PMGKAY: मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मोदी सरकारचा मोठा निर्णय)
PMGKAY अंतर्गत धान्य वाटपाचा शेवटचा महिना
अंत्योदय कुटुंबांना 35 किलो आणि बीपीएल, ओपीएच कुटुंबांना 2 रुपये प्रति किलो दराने 5 किलो धान्य दिले जाते. याशिवाय सप्टेंबरमध्ये कोरोना महामारीच्या काळात सुरू झालेली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) डिसेंबरपर्यंत सुरू ठेवण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. त्यानुसार केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेशन वितरणाचा हा शेवटचा महिना असून या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थीला ५ किलो गहू मोफत दिले जात आहे.
Join Our WhatsApp Community