हातगाडीवरील खरवस खाण्यापूर्वी ही बातमी वाचा!

190

तुम्ही रस्त्यावरील विक्रेत्यांकडून खरवस घेत असाल, तर खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण खरवस पुरवठा करणाऱ्या दोन उत्पादकांच्या दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. या कारवाईमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात बनावट खरवस विकला जात असल्याची माहिती उघडकीस आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी १ लाख १७ हजार ३३० रुपयांचा खरवस आणि दूध जप्त केले आहे.

( हेही वाचा : गडचिरोलीत स्कूल बसचा भीषण अपघात! अनेक विद्यार्थी जखमी)

मुंबईत मोठ्या संख्येने हातगाड्यांवर खरवस विकला जात असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांच्या लक्षात आले. खरवस बनवणारी दोन दुकाने कुर्ल्यात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासानाच्या अधिका-यांना मिळाली होती. त्या आधारावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी कुर्ला पूर्व येथील दोन दुकानांवर मंगळवारी छापा टाकला. यावेळी अधिका-यांना समजले की, दोन्ही ठिकाणी रोज चारशे ते पाचशे किलो खरवस बनवले जाते. मुंबईत चारशे ते पाचशे किलो खरवस बनवण्यासाठीचा दूध पुरवठा कसा होतो असा प्रश्न अधिका-यांनी विचारताच दुकानदारांनी गुजरात राज्यातील कोलेस्ट्रोम कंपनीकडून दूध विकत घेत असल्याचे सांगितले. मात्र जप्त खरवस बनावट असल्याचा दावा अन्न व औषध विभागाच्या अधिका-यांनी केला आहे. प्रयोगशाळा अहवालानंतर कारवाईची दिशा ठरेल, अशी माहितीही अधिका-यांनी दिली.

कुर्ला येथील दोन दुकानांवर छापा

दुकानांचे नाव – अन्नाचे नमुने – जप्त साठा – जप्त साठ्याची किंमत

  • अकबर अली – कोलेस्ट्रोम नावाच्या कंपनीचे दूध, ४४८ लीटर, किंमत – ३१ हजार ३६०
    खरवस : २२३ किलो, किंमत – २० हजार ७०
  • महाराष्ट्र खरवस सेंटर – कोलेस्ट्रम नावाच्या कंपनीचे दूध, ६३८ लीटर, किंमत ४४ हजार ६६०
    खरवस : २३६ किलो, किंमत – २१ हजार २४०
  • एकूण – कोलेस्ट्रम नावाच्या कंपनीचे दूध – १ हजार ४८६ लीटर
    खरवस – ४५९ किलो
    एकूण जप्त मालाची किंमत – १ लाख १७ हजार ३३०.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.