विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच डाॅक्टर, तंत्रज्ञांच्या साडे चार हजार जागांवर भरती कर ण्यात येणार असल्याची घोषणा गिरीश महाजन यांनी केली. ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली.
सध्या 28 टक्के पदे रिक्त
अधिवेशनात गिरीश महाजन म्हणाले, आम्ही एमपीएसच्या माध्यमातून 300 डाॅक्टर भरले आहेत. सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत यासंदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करण्यात येईल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एमपीएससी मार्फत जागा भरण्यास वेळ लागतोय महाजन पुढे म्हणाले, आतापर्यंत 10 टक्के हाॅस्पिटल आणि 90 टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी होती, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलत आहोत. आता 30 टक्के हाॅस्पिटल आणि 70 टक्के हाफकिन अशी औषध खरेदी केली जाईल.
( हेही वाचा: जबाबदारी झेपत नसेल तर पद रिकामे करा; राज ठाकरेंनी मनसे पदाधिका-यांना खडसावले )
2024 पर्यंत JJ सुपर स्पेशालिस्ट हाॅस्पिटल
नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे रुग्णांची संख्या मोठी असते. व्हेंटिलेटर तत्काळ उपलब्ध करायचे म्हटले तरी ते शक्य होत नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. म्हणून जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात येतील, असे महाजन म्हणाले. 2024 पर्यंत जे. जे. सुपर स्पेशालिस्ट हाॅस्पिटल करत आहोत. तसेच, रिचर्ड अॅंड क्रुडास येथील जागा जी 99 वर्षांच्या करारावर देण्यात आली होती. त्यांची मुदत 20 वर्षांपूर्वी संपली आहे. ती जागा जेजे ला मिळाली तर मोठा फायदा होणार आहे. हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात आहे. अपेक्षा आहे लवकरच निर्णय लागेल, असे महाजन म्हणाले.
Join Our WhatsApp Community