विधानसभेत लक्षवेधीला केवळ दोनच मंत्री; २७८ आमदारांचीही दांडी

132

विधिमंडळाचा वेळ अमूल्य असतो, असे म्हटले जाते. त्यामुळे सर्वपक्षीय आमदार आणि मंत्र्यांनी वेळेत कामकाजाला उपस्थित रहावे, असा अलिखित नियम आहे. परंतु, नागपूरच्या अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक आमदार आणि मंत्र्यांनी हा नियम पायदळी तुडवल्याचे पहायला मिळत आहे.

(हेही वाचा – किम जोंग उनचं अजब फर्मान! रेड लिपस्टिकवर बंदी, पण कारण काय?)

आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने 17 वर्षांच्या तरुणीला आई-वडीलांसमोर प्राण सोडावे लागल्याची घटना घडली. यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी मांडली. यावेळी केवळ 2 मंत्री, सत्ताधारी आमदार 3 आणि विरोधी पक्षातील 5 आमदार उपस्थित होते. त्यामुळे मंत्री आणि आमदारांच्या या अनास्थेविषयी पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने 17 वर्षांच्या तरुणीला आई-वडीलांसमोर प्राण सोडावे लागल्याची घटना दुर्दैवी असून, सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसे वेंटीलेटर उपलब्ध करण्यात यावेत, ते चालू राहतील याची दक्षता घेण्यात यावी. रुग्णालयांमध्ये औषधे व इतर सामग्री उपलब्ध ठेवावी. डॉक्टर व इतर कर्मचारी वर्ग पुरेसा ठेवावा. नवीन रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालय सुरु करताना आधीच्या रुग्णालयातील स्टाफची पळवापळवी करु नये. डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली.

आमदार गेले कुठे?

नागपूरमधील जमीन गैरव्यवहाराप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विरोधक आमदार पायऱ्यांवर उतरण्याची तयारी करीत होते. तर, सत्ताधारी पक्षाचे आमदार त्यांच्या विरोधात भजन आंदोलन करण्यात मशगुल होते. त्यामुळे सभागृहात त्या सगळ्यांची गैरहजर होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.