कोविड नियमांचे पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवा; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे राहूल गांधींना पत्र

153

आता पुन्हा एकदा संपूर्ण जगावर कोरोना या जीवघेण्या व्हायरसचे संकट घोंगावू लागले आहे. फक्त चीनच नव्हे तर जापान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्येदेखील कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारताने सावध होत उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी राहुल गांधींना पत्र लिहित भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यात्रेदरम्यान नियमांचे पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असे मांडवीया यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

( हेही वाचा: विधानसभेत लक्षवेधीला केवळ दोनच मंत्री; २७८ आमदारांचीही दांडी )

यात्रेत फक्त कोरोना वॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना परवानगी द्यावी

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोरोनाच्या प्रसारावर चिंता व्यक्त केली आहे. आरोग्यमंत्री आपल्या पत्रात म्हटले की, कोरोना महामारी ही सार्वजनिक आपत्ती आहे. त्यामुळे देशहितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेता येईल. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, तसेच यात्रेदरम्यान सर्वांनी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करावा. भारत जोडो यात्रेत फक्त कोरोना वॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना सहभागी होण्याची परवानगी द्यावी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.