माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावर दिलेली स्थगिती 3 जानेवारीपर्यंत कायम ठेवावी यासाठी CBI ने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने देशमुखांना दिलासा दिलेला नाही. उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या जामिनावरील स्थगिती 6 दिवसांसाठी वाढवली आहे. 27 डिसेंबरला आता यावर पुढील सुनावणी घेतली जाणार आहे.
( हेही वाचा: पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार, फडणवीसांची घोषणा )
अनिल देशमुख यांच्या जामिनावरील स्थगिती 3 जानेवारीपर्यंत वाढवण्याची विनंती सीबीआयने उच्च न्यायालयाकडे केली होती. परंतु न्यायालयाने 27 डिसेंबरपर्यंत जामिनावर स्थगिती दिली आहे. तसेच, न्यायालयाने सीबीआयला यापुढे कोणतीही विनंती मान्य करणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता 27 डिसेंबरच्या आत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती आणली तरच अनिल देशमुख यांचा कारागृहातील मुक्काम वाढेल. अन्यथा, अनिल देशमुखांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
Join Our WhatsApp Community