नववर्षात एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार २०० ‘हिरकणी’! आरामदायी प्रवासासाठी विशेष सुविधा

191

एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच ‘हिरकणी’ बस दाखल होणार आहेत. या बसगाड्यांमध्ये प्रवाशांसाठी पुशबॅक आसन व्यवस्था असणार आहे. १९८१ मध्ये हिरकणी बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती. या बसगाड्या प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ थांब्यांजवळील वोगो ई-बाईक सेवेचा लाभ कसा घ्याल? कुठे कराल नोंदणी? )

हिरकणी बसची संख्या कमी न करण्याचा निर्णय

एसटीच्या रुपात अलिकडे अनेक बदल झाले आहेत. खासगी ट्रॅव्हल्सप्रमाणे सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाने ताफ्यात शिवनेरी, शिवशाही आसन आणि शयनयान, अश्वमेध, मिडी यशवंती सेवेत आणल्या आहेत. लवकरच आता एसटीच्या ताफ्यात शिवाई बसेस सुद्धा येणार आहे. या नव्या बसेस ताफ्यात आल्यावर हिरकणी बसची संख्या कमी करण्यात आली होती. कालमर्यादा संपलेल्या हिरकणी बस साध्या लाल बसमध्ये रुपांतरित करण्यात येत आहेत. परंतु आता एसटी महामंडळाने हिरकणी बसची संख्या कमी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरामदायी प्रवास…

सध्या एसटीच्या ताफ्यात ४०० हिरकणी असून यातील २०० बसची कारमर्यादा संपुष्टात आली आहे त्यामुळे या बसेसचे लवकरच साध्या बसमध्ये रुपांतर केले जाईल. फक्त २०० हिरकणी बस महामंडळाच्या ताफ्यात राहतील. एसटीच्या ताफ्यात लवकरच ७०० विनावातानुकूलित बस दाखल होणार आहेत यातील २०० बस हिरकणी असणार आहेत. यामध्ये ३३ पुशबॅक प्रकारची आसने असणार आहेत. तसेच नव्या हिरकणींमध्ये आसन व्यवस्थेतील अंतर हे तुलनेने अधिक असेल जेणेकरून प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.