कोरोनाबाबत केंद्राचा अलर्ट; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

135

मागील वर्षभर जगभरात कोरोनाच्या संसर्गाबाबत काहीशी दिलासा देणारी स्थिती होती, परंतु २०२२ च्या अखेरीस चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. इथे कोरोनाची चौथी लाट उसळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा बरोबर अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांतही कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. अशा वेळी हा विषयही महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मोठी घोषणा केली.

अजित पवारांनी २ वर्षांपूर्वीची आठवण करून दिली

चीन आणि अमेरिकेसारख्या देशांत पुन्हा कोरोना महामारीने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना खबरदारीच्या सुचना केल्या आहेत. यासंदर्भात आत विधानसभेतही विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मागील दोन वर्षातील लॉकडाऊन काळाची आठवण करुन दिली. महाराष्ट्रासह देशाने जगाने कोरोनाची मोठी किंमत चुकवली आहे. अमेरिका आणि चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्यामुळे त्यांना लॉकडाऊन लावावे लागले. पहिली केस आमच्या निदर्शनास आली तेव्हा एक जोडपे दुबईहून आले होते. यानंतर ते गाडीत बसले आणि ड्रायव्हरला कोरोना झाला आणि त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. जपान, चीन, कोरिया, ब्राझील सारख्या देशांमध्ये कोरोनाचे नवीन व्हेरियंट समोर येत आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चीनमधील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नसल्याने रुग्णांना गाड्यांमध्ये अॅडमिट केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी २० डिसेंबरला कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत काळजी आणि तपासणी करून खबरदारी घेण्याचा सल्ला सर्व राज्यांना दिला आहे. चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सरकार उच्चाधिकार समिती किंवा टास्क फोर्स स्थापन करत आहात का किंवा जगभरातील कोरोनासंदर्भात काय प्रयत्न केले जात आहेत याचा अभ्यास करणारी कोणतीही समिती नेमणार आहात का? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.

(हेही वाचा नागपूरमध्ये जितेंद्र आव्हाडांचा बॅनर; शरद पवार आणि पक्षाचे नावही गायब)

देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा

त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तात्काळ टास्क फोर्स किंवा समिती स्थापन करण्याची घोषणा केली. विरोधी पक्षाने खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. राज्य सरकारकडून केंद्रासोबत समन्वय ठेवला जाईल. यावर एक समिती किंवा टास्क फोर्स गठीत केली जाईल. ती बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवेल आणि बदलत्या परिस्थितीनुसार सल्ले देईल, या सल्ल्याचा पालन केले जाईल, अशी फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.