नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक केरळ, गोवा, कोकण फिरण्याचे नियोजन करतात. अशावेळी रेल्वे गाड्यांचे आरक्षण उपलब्ध होत नसल्याने रेल्वेकडून अतिरिक्त गाड्या सोडल्या जातात. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई ते कन्याकुमारी दरम्यान कोकण रेल्वेमार्गे विशेष ट्रेन चालविणार आहे.
( हेही वाचा : हवे ‘बेस्ट’ घर! हक्काच्या घरासाठी कर्मचाऱ्यांची मागणी)
मुंबई ते कन्याकुमारी विशेष रेल्वे धावणार
- गाडी क्रमांक 01461 ही विशेष गाडी दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी 15.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि कन्याकुमारी येथे दुसऱ्या दिवशी 23.20 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01462 ही विशेष कन्याकुमारी येथून दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी 14.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 23.00 वाजता पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, थलास्सेरी, कोझिकोड, तिरूर, शोरनूर, थ्रिसूर, एर्नाकुलम, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायनकुलम, कोल्लम जंक्शन, तिरुवनंतपुरम सेंट्रल, कुलितुराई, नागरकोइल जंक्शन.
संरचना: दोन द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे ज्यामध्ये दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन.
आरक्षण: सर्व आरक्षण प्रणाली केंद्रांवर/स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह 01461 विशेष गाड्यांचे बुकिंग सुरू आहे. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community