दादर पूर्व व पश्चिम दिशेला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून हे काम पुढील दोन वर्षांमध्ये पूर्ण केले जाणार आहे. या पुलाचे बांधकाम करण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे ३७५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
मध्य रेल्वे व पश्चिम रेल्व प्राधिकरणाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र रेल इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड अर्थात एमआरआयडीसीएल रेल्वे प्राधिकरण व महाराष्ट्र संयुक्त संस्थेमार्फत मुंबईतील १० रेल्वे लाईनवरील पूलांची आणि १ रेल्वे लाईन खालील वाहतूक मार्गाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच १ रेल्वेवरील नवीन पूल बांधण्याच्या कामांना स्थायी समितीने मंजूरी दिलेली आहे. त्यामध्ये दादर टिळक पूलाचाही सामावेश आहे. हे पूल ९७ वर्षे जुने असून ब्रिटीश राजवटीत बांधलेल्या या पुलाचे आयुर्मान संपल्याने ब्रिटीशांनीही भारताला कल्पना देऊन या पुलाची डागडुजी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पुलावरील काही भाग खचल्यामुळे २०१९मध्ये या पुलाच्या डागडुजीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करून पुलावरील सिमेंटच्या लाद्या काढून त्याऐवजी लोखंडी पत्र्याच्या आधारे हे काम केले. त्यामुळे या पुलावरील बराच वजनाचा भार यामुळे कमी करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला होता. परंतु आता या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या पुलाच्या कामासाठी सुमारे ३७५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या पुलाचे काम हाती घेण्यात आले असून हे नवीन पूल केबल स्टेडच्या मदतीने बांधले जाणार आहे. या पुलाची लांबी ही ६६३ मीटर एवढी असून हा प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा मार्गिकेचा असेल.
हा पूल न पाडता या पूलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा पूल रेल्वे मार्गावरून जाणार असून नवीन पूल बांधून झाल्यानंतर जुने पूल पाडले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या पुलाच्या बांधकामामध्ये अडथळा ठरणारी झाडे कापण्यासाठी तसेच फांद्यांची छाटणी करण्यासाठी दीड लाख रुपये तर भू तांत्रिक तपासणीच्या सर्वेसाठी ६३ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.
Join Our WhatsApp Community