इन्स्टाग्रामवर दिसेल तुमचा २०२२ चा संपूर्ण प्रवास; या स्टेप्स करा फॉलो…

170

सोशल मिडियावर हल्ली सगळेजण सक्रिय असतात. इन्स्टाग्रामच्या रिल्सला (Reels) जगभरातील युजर्सकडून सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच आता इन्स्टाग्रामचा वापर करत आहेत. इन्स्टाग्रामने युजर्ससाठी २०२२ Recap Reel फिचर आणले आहे. या फिचरच्या मदतीने वापरकर्ते २०२२ ची रिकॅप रिल तयार करू शकतात आणि प्रोफाइलवर शेअर सुद्धा करू शकतात.

( हेही वाचा : हवे ‘बेस्ट’ घर! हक्काच्या घरासाठी कर्मचाऱ्यांची मागणी)

२०२२ रिकॅप रिल्स कशी तयार कराल जाणून घ्या…

इन्स्टाग्रामवर या फिचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला ३ ते १४ फोटो किंवा व्हिडिओसाठी निवड करावी लागेल. इन्स्टाग्राम टेम्पलेट (template) किंवा सेलिब्रिंटीनी तयार केलेल्या टेम्पलेटचा वापर करून युजर्स रिल्स तयार करू शकतात आणि तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर शेअर करू शकतात.

या आहेत स्टेप्स…

  • इन्स्टाग्रामच्या मुखपृष्ठावर दिलेल्या Create Your 2022 Recap Reel या पर्यायावर क्लिक करा.
  • आवडीचे टेम्प्लेट निवडा
  • आपल्या आवडीचे फोटो किंवा व्हिडिओ निवडा.
  • सर्व फोटो/व्हिडिओ निवडल्यानंतर, नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुम्ही क्रिएट केलेला संपूर्ण व्हिडिओ दिसेल यात तुम्ही अंतिम करण्याआधी आवश्यक बदल करू शकता.
  • सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उजव्या कोपऱ्यात next पर्याय येईल. तुम्ही इच्छेनुसार कलर फिचर, मजकूर नमूद करू शकता.
  • संपूर्ण प्रक्रिया झाल्यावर योग्य कॅप्शन देऊन तुम्ही रिल्स शेअर करू शकता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.