फेसबूक पोस्ट करत दिला राजीनामा ; ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाचा शिंदे गटात प्रवेश

158

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुनिल पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर काही तासांपूर्वी महत्त्वाची माहिती दिली होती. ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली होती. त्यानंतर भाऊ चौधरी यांच्या समर्थनार्थ सुनिल पाटील यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.

सुनिल पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. आमचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांच्या समर्थनार्थ माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असे सुनिल पाटील यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

( हेही वाचा: आघाडीचा महामोर्चा तर हिंदूंचा विराट मोर्चा; साम्य आणि अंतर! )

काय म्हणाले सुनिल पाटील?

माझा शिवसेना उद्धव गटाचा राजीनामा. मी सुनिल पाटील, शिवसेना ( उद्धव गट) नाशिक ग्रामीण जिल्हा प्रमुख आमचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या समर्थनार्थ मी शिवसेनेला जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असे सुनिल पाटील यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो, हम नाशिककर आपके साथ है, असेदेखील सुनिल पाटील म्हणाले.

भाऊ चौधरी यांचा शिंदे गटात प्रवेश

उद्ध ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केलेले नाशिकचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी हे नागपुरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.