विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता प्रत्येक प्रवाशाची…

149

कोरोना महामारीचे केंद्रबिंदू ठरलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. चीननंतर इतर देशांसह भारतातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला अलर्ट केले आहे. टेस्टिंग आणि लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याशिवाय इतर देशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची विमानतळावर टेस्टिंग करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही विमानाने प्रवास करत असाल तर आता तुमचीही कोरोना टेस्ट केली जाणार आहे.

(हेही वाचा – गर्दीच्या ठिकाणी पुन्हा ‘मास्क सक्ती’; केंद्राची राज्यांना सूचना )

केंद्र सरकारने राज्याला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. यावेळी तानाजी सावंत म्हणाले, राज्यात सध्या कोणताही नवा कोरोनाचा व्हेरिएंट आढळलेला नाही. त्यामुळे राज्यातील जनतेने घाबरण्याचे कारण नाही. यासह आरोग्य विभाग खबरदारी घेत असून टेस्टिंग डिपोर्टमेंटला तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. तालुका पातळीपासून ते महानगर पालिकेतील सर्व यंत्रणांना खबरदारी घेण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर आरोग्य भरती करण्यावरही आमचा भर असल्याची माहितीही त्यांनी दिली.

फक्त चीनमधूनच नाही तर आपल्या देशात येणाऱ्या प्रत्येकाची विमानतळावर थर्मल टेस्टिंग करण्याचे आदेश देण्यात आलेत. आपल्या देशातून कोणी परदेशात गेले आणि परदेशातून आल्यावरही त्यांची टेस्टिंग करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही तानाजी सावंत यांनी दिले आहेत. त्याबरोबर राज्यात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे नागरिकांची इम्युनिटी चांगली आहे, त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. मास्क घालणं बंधनकारक करायचं की नाही, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.