समृद्धी महामार्गावर ‘रोड हिप्नॉसिस’: चालकाला डुलकी लागत असल्याने अपघात वाढले

154

बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर सर्वाधिक चर्चा आहे ती, या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची. ११ ते १९ डिसेंबरच्या काळात समृद्धी महामार्गावर ५१ अपघात झाले. यातील २७ अपघात वन्य प्राण्यांचे, तर चालकाला डुलकी लागल्याने सहा अपघात झाल्याचे समोर आले आहे. हा रोड हिप्नॉसिसचा प्रकार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – “A फॉर आफताब, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच!”, नितेश राणेंचा हल्लाबोल)

समृद्धी महामार्ग हा सरळ रेषेत असल्याने, वाहन चालवताना चालकाला ‘रोड हिप्नॉसिस’ म्हणजेच, झोप लागण्याची अवस्था निर्माण होते. आपण किती वेगात जातोय, याचे भान चालकाला राहत नसल्याने अचानक झोप लागते. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. त्याचप्रमाणे या महामार्गावरून प्रवास करताना वाहनाची स्थितीही तपासा; जेणेकरून अर्ध्या रस्त्यात वाहनात तांत्रिक बिघाड होऊन अपघातजन्य स्थिती निर्माण होणार नाही.

अशी घ्या काळजी…

– प्रवासाआधी वाहनाची तपासणी करा, टायरमध्ये नायट्राेजन हवा भरा
– ४० हजार किमीपेक्षा जास्त चाललेले टायर शक्यतो या मार्गावर चालवू नका
– ब्रेक, लायनर, वायरिंगची तपासणी करून या मार्गावरून वाहने चालवावी.
– अपघात झाल्यास १८००२३३२२३३, ८१८१८१८१५५ या हेल्पलाइनला संपर्क साधा

समृद्धी महामार्गाच्या या हद्दीत आतापर्यंत शिर्डी ३, वैजापूर २, वेरूळ १, औरंगाबाद १०, जालना ७, सिंदखेडराजा ४, मेहकर ३, मालेगाव ३, सेलू बाजार २, धामणगाव, वर्धा ७, वायफळ हद्दीमध्ये ४ असे अपघात झाले आहेत.

वेग मर्यादा अशी

  • – 120 किमी प्रतितास कारसाठी
  • – 80 किमी प्रतितास मालवाहतुकीच्या वाहनांसाठी
  • – 100 किमी प्रतितास प्रवासी वाहनांसाठी वेग निश्चित
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.