ST कर्मचारी बॅंकेत गेल्या आठ-दहा वर्षांपासून निम्म्याहून अधिक पदे रिक्त असून पदभरती नेमकी कोणाकडून करायची यावर व्यवस्थापन आणि संचालक मंडळ यांच्यात वाद सुरु आहे. संचालक मंडळाला महाराष्ट्र बॅंक फेडरेशनकडून पदभरती करुन हवी आहे, तर व्यवस्थापनाला इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनेल योग्य वाटते. या वादामुळे कर्मचारी भरती रखडली असून, कर्मचा-यांच्या अभावाचा परिणाम एसटी बॅंकेला बसत आहे.
( हेही वाचा: समृद्धी महामार्गावर ‘रोड हिप्नॉसिस’: चालकाला डुलकी लागत असल्याने अपघात वाढले )
अंतर्गत वादामुळे भरती रखडली
एसटी महामंडळातील कर्मचा-यांची स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑप बॅंक ही अग्रणी बॅंक म्हणून गणली जाते. स्टेट ट्रान्सपोर्ट को-अॅप बॅंकेच्या राज्यभरात 52 शाखा असून 11 विस्तार केंद्रे कार्यरत आहेत. एसटी महामंडळाचे 74 हजार कर्मचारी या बॅंकेचे सभासद आहेत. कर्मचारी भरतीसाठी बॅंक व्यवस्थापन आयबीपीएसला प्राधान्य दिल्यास भरतीसाठी खर्च कमी येईल, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे, तर फेडरेशनच्या दरांबाबत त्यांच्याशी वाटाघाटी करु, पण त्यांनाच प्राधान्य देऊ, अशी संचालक मंडळाची भूमिका आहे.
Join Our WhatsApp Community