आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत यंदा 14 डिसेंबरपर्यंत 4.21 कोटी लोकांवर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. त्यासाठी 49 हजार कोटी रुपयांहून रक्कम खर्च करण्यात आल्याचे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅक्टर भारती पवार यांनी सांगितले.
काय आहेत सुविधा?
- 10.74 कोटी कुटुंबांपैकी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांच्या आरोग्य विम्याचे संरक्षण.
- उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली की हा विमा उपयोगी ठरतो.
( हेही वाचा: इन्स्टाग्रामवर दिसेल तुमचा २०२२ चा संपूर्ण प्रवास; या स्टेप्स करा फॉलो… )
का तयार केली योजना?
जनतेला परवडणा-या दरांमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राष्ट्रीय आरोग्य मोहिमेच्या अंतर्गत केंद्राकडून राज्य सरकारांना निधी देण्यात येतो.
कोणत्या योजनांसाठी होते मदत?
- जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम
- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम
- मोफत वैद्यकीय चाचण्या
- प्रधानमंत्री नॅशनल डायलिसिस प्रोग्राम
- National Health mission (NHM) या योजनेसाठी
- 64 हजार 180 कोटी रुपये खर्च होतात. या निधीतून राज्यांना वित्तीय व तंत्रज्ञानविषयक साहाय्य देण्यात येते.
- गरीब कुटुंबांवर उत्तम वैद्यकीय उपचार व्हावेत यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.
महिलांना फायदा काय?
- आयुषमान भारत हेल्थ अॅंड वेलनेस सेंटरमार्फत महिलांची प्रसूती, बालकांवरील उपचार, आदी कामे करण्यात येतात. देशात अशी 1 लाख 21 हजार 150 वेलनेस सेंटर कार्यरत आहेत.
- 29 नोव्हेबंरपर्यंत 27 कोटी 46 लाख 56 हजार 356 आयुषमान भारत हेल्थ अकाऊंट्स उघडण्यात आली आहेत.