महामुंबईत 296 CNG पंपची उभारणी करणार; ‘या’ शहरांत मिळणार सुविधा

150

वाहनांची गर्दी सातत्याने वाढत असताना, सीएनजी इंधनाची मागणीदेखील वाढली असेल. त्यामुळेच महामुंबईत नवीन 296 सीएमजी पंपांची उभारणी होणार आहे. यासाठी महानगर गॅस लिमिटेडने 500 ते 1225 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडांची मागणी केली आहे.

महानगर गॅस लिमिटेड ही केंद्र सरकारी गॅस ऑथोरिटी इंडियाची उपकंपनी आहे. एमजीएलकडून महामुंबईतील 16 लाख घरांमध्ये पाईपने स्वयंपाकासाठी नैसर्गिक वायूचा इंधन म्हणून पुरवठा केला जातो. त्याखेरीज मुंबईतील ऑटोरिक्षा, टॅक्सी, कॅब व अनेक बसगाड्यादेखील नैसर्गिक वायू अर्थात CNG वर चालतात. या सीएनजीचा पुरवठा महानगर गॅसकडूनच केला जातो. त्यासाठी सध्या कंपनीचे महामुंबईत जवळपास 300 पंप आहेत.

( हेही वाचा: समृद्धी महामार्गावर ‘रोड हिप्नॉसिस’: चालकाला डुलकी लागत असल्याने अपघात वाढले )

पाच वर्षांत 100 पंप करणार सुरु

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने देशात 2030 पर्यंत 18 हजार नवे सीएनजी पंप असतील, असे नियोजन आखले. सध्या महामुंबई क्षेत्रातील हा आकडा 300 वर आहे. हाच आकडा सन 2017 मध्ये 200 होता. पाच वर्षांत फक्त 100 नवीन पंप सुरु होऊ शकले. देशभरात सध्या 4500 सीएनजी पंप आहेत. ही संख्या 18 हजारांवर गेल्यास सध्याच्या टक्केवारीनुसार, महामुंबईत किमान 90 हून अधिक पंपांची उभारणी आवश्यक असेल. पण सध्याचा वेग कायम राहिल्यास 2030 पर्यंत अधिकाधिक 150 नवे सीएनजी पंप महामुंबईत उभे राहतील, असे चित्र आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.