जगभरातील देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी भारत सरकार सतर्क झाला आहे. अशा सगळ्या वातावरणात तेलंगणाचे आरोग्य संचालक जी श्रीनिवास राव यांनी भारतातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असण्यामागील श्रेय ख्रिश्चन धर्माला दिले, या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
काय म्हणाले राव?
येशूमुळे कोरोना कमी झाला आहे. भारतीय ख्रिश्चन धर्मामुळे वाचले. डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांमुळे परिस्थिती हाताळली नाही, तर येशूच्या दयाळूपणामुळे परिस्थिती हाताळली गेली, असेही त्याने पुढे सांगितले. भारताच्या विकासामागे ख्रिश्चन धर्म कारणीभूत आहे, असे आरोग्य संचालक जी श्रीनिवास राव म्हणाले. ख्रिसमसच्या एका कार्यक्रमाला उपस्थित असताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते कृष्ण सागर राव म्हणाले की, असे वक्तव्य करायला नको होते. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी बुधवारी सांगितले की, कोविड-19 अद्याप संपलेला नाही. सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
(हेही वाचा नागपूरात भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चा; लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन)
Join Our WhatsApp Community