SBI बॅंकेत १४३८ रिक्त जागांसाठी भरती! मुलाखतीद्वारे होणार निवड, येथे करा अर्ज

226

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी पदांच्या एकूण १४३८ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटती तारीख ही १० जानेवारी २०२३ आहे.

( हेही वाचा : २०२३ मध्ये IPL केव्हा सुरू होणार? BCCI ने दिले संकेत)

अटी व नियम जाणून घ्या…

  • पदाचे नाव – संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी
  • पदसंख्या –
    संकलन सूत्रधार – ९४० पदे
    सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी – ४९८ पदे
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – ६५ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – २२ डिसेंबर २०२२
    अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२३
  • अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

वेतनश्रेणी

सेवानिवृत्त बॅंक अधिकारी/कर्मचारी

  • Clerical – २५ हजार रुपये
  • JMGS – I – ३५ हजार रुपये
  • MMGS – II & MMGS – III – ४० हजार रुपये
  1. निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असणार आहे.
  2. बॅंकेने स्थापन केलेली शॉर्टलिस्टिंग समिती शॉर्टलिस्टिंग पॅरामीटर्स ठरवेल आणि त्यानंतर बॅंकेने ठरविल्यानुसार पुरेशा उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडले जाईल.
  3. मुलाखतीला १०० गुण असतील, मुलाखतीतील पात्रता गुण बॅंकेद्वारे ठरवले जातील. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.