सर्वसामान्यांना दिलासा! कॅन्सरसह ‘या’ गंभीर आजारांवरील औषधं झाली स्वस्त, असे आहेत नवे दर

166

गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईंना दिलासा देणारी बातमी आहे. कारण केंद्र सरकारने कॅन्सर, डायबिटिस, हेपेटायटिससह अनेक गंभीर आजारावरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचे दर ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने अत्यावश्यक औषधांच्या यादीत समावेश असलेल्या ११९ औषधांचे कमाल दर निश्चित केल्याने या किमतीमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

(हेही वाचा- दिशा सालियन प्रकरणाची SIT मार्फत होणार चौकशी, फडणवीसांची विधानसभेत घोषणा)

यासह येत्या काही दिवसात आणखी काही औषधांचा समावेश हा एनएलईएममध्ये करून त्यांच्या कमाल किमती निश्चित करण्याचा केंद्राचा विचार आहे. ताप आल्यावर दिल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉल गोळीचे दर देखील १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. दरम्यान, नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अॅथॉरिटीच्या बैठकीमध्ये या यादीत समावेश असलेल्या ११९ प्रकारच्या फॉर्म्युलेशनवाल्या औषधांची कमाल किंमत प्रति टॅबलेट आणि कॅप्सुलबाबत निश्चित करण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रमुख औषधांचे दर कमी करण्यात आले असून यामध्ये तापावरील पॅरासिटामॉल आणि मलेरियावरील  उपचारांसाठी वापरण्यात येणारं औषध हायड्रोक्सीक्लोरोक्विन यांचाही समावेश आहे.

औषधांची जुने दर आणि नवे दर

  • टेमोझोलोमाइड – ६६२.२४ रुपये, ३९३.६ रुपये
  • एलोप्युरिनॉल – ८.१ रुपये, ५.०२ रुपये
  • सोफोसबुवीर – ७४१.१२ रुपये, ४६८.३२ रुपये
  • लेट्रोझोल – ३९.०३, २६.१५ रुपये
  • क्लेरिथोरोमाइसिन – ५४.८ रुपये, ३४.६१ रुपये
  • हेपरिन – २४.३९ रुपये, १८.९२ रुपये
  • फ्लुकोनाझोल – ३४.६९ रुपये, २६.५३ रुपये
  • मेटफोर्मिन – ४ रुपये, ३.११ रुपये
  • सोफिक्सिम – २४.५ रुपये, १९.७१ रुपये
  • पॅरासिटामोल – २.०४ रुपये, १.७८ रुपये
  • हायड्रोक्सिक्लोरोक्विन – १३.२६ रुपये, १२.३१ रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.