सत्तेचा दुरुपयोग करून मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात काय पुरुषार्थ? नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

255
आदित्य ठाकरे जे सांगत आहेत की, माझा काही संबध नाही. ३२ वर्षांच्या तरुण सगळ्यांना पुरून उरला. अरे, सत्तेचा दुरुपयोग करून एका मुलीवर अत्याचार करून, तिची हत्या करणे हा पुरुषार्थ आहे का? चौकशी होऊ द्या मग त्यांना समजेल, आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियनच्या केसमध्ये माझ्यामते आरोपी आहेत आणि त्यांना वाचवण्याचा आतापर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना प्रयत्न केला गेला. त्यांनी अनेक भ्रष्टाचारही पचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आता सगळे बाहेर येणार. ग्रामपंचायत निवडणुकीत उडालेला धुव्वा, मोर्चाचा फज्जा आणि आता एसआयटी लावल्यामुळे मातोश्रीत झोप उडालेली आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर नारायण राणे बोलत होते.

आत्मपरीक्षण करा 

मोर्चाच्या दिवशी उद्धव ठाकरे म्हणाले की, छाताडावर नाचू आम्ही. ग्रामपंचायत निवडणुकीचा माझ्याकडे निकाल आहे. ७ हजार ६८२ पैकी शिवसेनेला ७२६ क्रमांक पाचवा, सगळ्यात शेवटचा आहे. जरा आत्मपरीक्षण करा, काय अवस्था झाली आहे. स्वत:च्या छाताडाचा विचार करा. नाचायचा काय विचार करताय, कुठे आलात तुम्ही?, काय करून ठेवले बाळासाहेबांच्या शिवसेनेचे. बाळासाहेब ठाकरेंनी मिळवले आणि यांनी गमावले. भाजपा क्रमांक एक वर आहे. २ हजार ४८२, शिंदे गटाचे ८४२ आणि अपक्ष व इतर आहेत १,३६२ हे परत भेटणार. निम्म्यापेक्षा जास्त जागा ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपाने जिंकल्या आहेत. कुठे आहेत उद्धव ठाकरे?, असेही राणे यावेळी म्हणाले.

संजय राऊतांनी जवळपास शिवसेनेला संपवले 

शिवसेना खासदार संजय राऊतांवर टीका करतांना नारायण राणेंनी म्हटले की, संजय राऊतांचे अभिनंदन करायला पाहिजे, त्यांनी जी शरद पवारांकडून सुपारी घेतली, शिवसेना संपवण्याची त्या दिशेने वाटचाल आहे. संजय राऊतांनी जवळपास शिवसेनेला संपवले आहे. म्हणून संजय राऊत आज जे काय बोलतात, फक्त इकडचा विषय तिकडे न्यायचा, शेवाळेंचा विषय काढला. पण शेवाळेंनी जी माहिती सांगितली, एकनाथ शिंदे जी माहिती सांगतात, जो भ्रष्टाचार सांगतात त्याबद्दल बोला. कोरोना काळात औषध खरेदीत जो भ्रष्टाचार झाला, आतापर्यंत जे जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ठाकरे कुटुंबावर, मातोश्रीवर त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. उद्धव ठाकरेही बोलत नाही आणि आदित्यही बोलत नाहीत. केवळ मीडियासमोर काहीही बडबड केली जाते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.