भाजप नेते मोहित कंबोज यांना ‘त्या’ प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट

127

भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांना क्लीन चीट मिळाली आहे. संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना, कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर पांडे आणि कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर पांडे आणि कंबोज यांच्यातील वाद बराच चर्चेत आला. या सर्व प्रकरणानंतर पांडे यांना अटकदेखील झाली होती.

आता याच कथित बॅंक घोटाळा प्रकरणात मोहित कंबोज यांना आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली आहे. आर्म्स अॅक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमधूनही कंबोज यांची सुटका झाली आहे. मुंबई पोलिसांनी दोन्ही प्रकरणात कंबोज यांना क्लीन चिट दिली आहे.

( हेही वाचा: वीर सावरकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी आमदार सरोज अहिरे यांची 100 कोटींची मागणी )

नेमके प्रकरण काय?

भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने जूनमध्ये गुन्हा दाखल केला होता. कंबोज यांनी इंडियन ओव्हरसीज बॅंकेकडून 2011 ते 2015 दरम्यान, 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम ज्या कारणासाठी घेतली होती, त्यासाठी वापरली गेली नसल्याचा आरोप त्यांच्यावर होता. आर्थिक गुन्हे शाखा EOW ने मुंबईत मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्या कंपनीने तब्बल 52 कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.