आनंदाची बातमी! आता भारतात Covid-19 वर मात करणं होणार आणखी सोपं

130

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातल्यानंतर भारतातही कोरोना व्हायरस पुन्हा परत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पुन्हा कोरोना लसीकरण, बुस्टर डोस, मास्कची सक्ती आणि लॉकडाऊन लागणार का अशा चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे भारतात आता नाकावाटे कोरोना लस देण्यात येणार आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या समितीकडून नेझल कोरोना व्हॅक्सिन वापरण्यास मंजुरी दिली आहे.

(हेही वाचा – ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा प्रगतीपथावर, ७० टक्के काम पूर्ण)

एककीडे जगात कोरोनाचा उद्रेक होत असून भारतात ओमायक्रॉनच्या सबव्हेरियंटचे तीन रुग्ण सापडल्याने प्रशासन अलर्टवर मोडवर आहे. बुधवारपासून केंद्र सरकारने कोरोनाबाबत अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

चीनमध्ये सुरू असलेल्या कोरोनाच्या थैमानात भारत बायोटेकच्या नाकातील लस (Bharat Biotech Nasal Vaccine) ला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. ही एक नाकावाटे दिली जाणारी लस असून आता फक्त नाकात दोन थेंब टाकून कोरोनावर मात करता येणार आहे. ही लस आजपासून म्हणजेच शुक्रवारपासून लसीकरण मोहिमेत समाविष्ट करण्यात येत आहे आणि ज्या लोकांनी Covaxin आणि Covishield घेतले आहेत ते देखील ही लस बूस्टर डोस म्हणून घेऊ शकतात.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी राज्यसभेत सांगितले की, तज्ज्ञ समितीने नेझल कोरोना लसीला मान्यता दिली आहे. भारत बायोटेकची नेझल कोरोना वॅक्सिन आजपासून कोविन अॅपवर समाविष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही लस केवळ खासगी रुग्णालयांमध्येच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लवकरच सरकार सरकारी रुग्णालयांपासून ते बाजारपेठेत उपलब्ध करून देऊ शकते, असा विश्वास आहे. या लसीला मान्यता मिळाल्याने आता कोणालाही लसीसाठी इंजेक्शन घेण्याची गरज भासणार नाही, तर केवळ नाकात दोन थेंब टाकूनही ही लस घेऊ शकणार आहात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.