रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला जवळपास 10 महिने झाले आहेत. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युद्ध संपवायला हवे असे म्हटले आहे. पुतीन यांच्या या वक्तव्यामुळे आता जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. याचवेळी पुतिन यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिल्याने सध्या चर्चा रंगली आहे.
( हेही वाचा: मोठी बातमी: अॅंटेलीया , मनसुख हिरेन प्रकरणात रियाझ काझीला उच्च न्यायालयाचा दिलासा )
राजनैतिक प्रयत्नांतून संपले पाहिजे
हे युद्ध राजनैतिक प्रयत्नांतून संपले पाहिजे, असे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी म्हटले आहे. केवळ युक्रेन युद्धच नाही तर इतर सर्व हिंसक संघर्षही संवादातून संपले पाहिजेत. युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तेथे जितक्या लवकर शांतता प्रस्थापित होईल तितके चांगले. अमेरिकेची पॅट्रियट क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली जुनी असल्याचे सांगून पुतिन म्हणाले की, रशियाचे सैन्य त्याला सामोरे जाण्यास सक्षम आहे. ही यंत्रणा रशियाच्या S-300 प्रणालीइतकी सक्षम नाही. रशियाकडे S-400 आणि त्याची अपग्रेडेड आवृत्तीही आहे.
Join Our WhatsApp Community