मागच्या काही दिवसांपासून हलाल मटणाबाबत वाद सुरु आहे. हिंदू सघटनांनी हलाल मटण तसेच, हलाल प्रमाणित वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. हिंदूंना हलाल मांस खाण्यास, तसेच हलाल प्रमाणित वस्तू खरेदी करण्याला भाग पाडले जाते. परंतु मुसलमान मात्र हिंदूंकडून कधीही मांस खरेदी करत नाहीत. एवढेच काय मासे जरी खायचे झाले तरी मुसलमान हिंदू कोळ्यांकडून मासे खरेदी न करता, जीवंत मासे आणून त्यांना हलाल पद्धतीने कापून मगच खातात.
इस्लम धर्मानुसार, मुसलमान लोकांना केवळ हलाल मांसच खाण्याची परवानगी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे मांस खायचे झाले तर मुसलमान लोक हलाल पद्धतीनेच कापलेले मांस खातात. त्यामुळे मासे खायचे असतील तर, हिंदू कोळ्यांकडे मिळणारे मासे खरेदी न करता, ते बाजारातून जीवंत मासे आणून त्यांना हलाल पद्धतीने कापून मगच शिजवत असल्याचे, एका मुसलमानाने सांगितले.
( हेही वाचा: एकविरा आईच्या दारी, हलाल मांसाची विक्री )
हलाल म्हणजे काय?
हलाल हा अरबी शब्द आहे. हलाल म्हणजे एखाद्या प्राण्याला कुठल्याही मशीन अथवा अन्य मार्गाने कापले किंवा मारले जात नाही, तर त्या पशूला हळूहळू हलाल करुन कापले जाते. त्यावेळी मुसलमान मनात कलमा म्हणतात, अर्थात मारलेला पशू आधी अल्लाला देतात आणि मग त्याचे ऊष्टे म्हणून ते नंतर खातात. असे हलाल पद्धतीने मारलेल्या पशूचे मांस विकले जाते. हलाल मांसासाठी, प्राण्याच्या गळ्याची श्वसन नलिका कापली जाते आणि त्यामुळे तो काही काळानंतर मरतो. या प्रक्रियेत जनावरांच्या मानेला चिरले जाते.
Join Our WhatsApp Community