चीन आणि अमेरिका या देशांमध्ये धुमाकूळ घालणा-या बीएफ.७ या व्हेरिएंटबाबत जगभरात आता भीतीचे वातावरण दिसून येत आहे. बीएफ.७ हा ओमायक्रॉन या कोरोनाच्या विषाणूचा उपउपप्रकार आहे. ओमायक्रॉनच्या बीए.५ या विषाणूचा हा उपप्रकार मानला जातो. हा विषाणू लसीकरण झालेल्या माणसांनाही होऊ शकतो. त्यामुळे या लसीकरणाबाबत ब-यापैकी भीतीचे वातावरण आहे.
बीएफ.७ बद्दल
हा विषाणू कोरोनाची लागण झालेल्यांना पुन्हा होऊ शकतो तसेच लसीकरण झालेल्यांनाही बीएफ.७ची लागण होऊ शकते
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ओमायक्रॉन या विषाणूमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट आली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बीएफ.७ विषाणूचा प्रसार झाल्याचे निदर्शनास आले होते. ओमायक्रॉन जीवघेणा नसला तरीही देशात सर्वांना डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात पुन्हा कोरोनाची लागण झाली होती. मात्र घरगुती विलगीकरणातच रुग्ण बरे होत होते. ओमायक्रॉनची लाट स्थिरावत असताना बीए.२ आणि बीए.५ असे दोन विषाणू दिसून आले. त्यानंतर बीए५.१.७ आणि बीएफ.७ हे दोन उपप्रकार बीए.५ चे कालांतराने रुग्णांमध्ये दिसून आले.
भारतात सध्या गुजरात आणि ओडिशा या राज्यात बीएफ.७ या विषाणूचे प्रत्येकी दोन रुग्ण सापडले आहेत. या विषाणूची व्याप्ती लक्षात घेता सार्वजनिक स्थळाला भेटी देत असताना आता सर्वांनी तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करावे, असे आवाहन डॉक्टरांच्या विविध संघटनांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community