कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या भीतीने मुंबई विमानतळावर आता आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना तपासणी सुरु करण्यात आली आहे. केंद्राकडून आदेश मिळताच आंतरराष्ट्रीय प्रवास करणा-या प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी केली जाणार असून शनिवारपासून या तपासणीला सुरुवात होईल.
चीन, युएस, फ्रान्स या देशांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. देशात गुजरात आणि ओडिशा राज्यांंमध्ये ओमायक्रॉनच्या बीएफ.७ या विषाणूचे प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. देशात चार रुग्ण सापडल्यानंतर अखेरिस आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या कोरोना तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला. गुरुवारी सायंकाळी उशिराने केंद्राने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या तपासणीचे आदेश दिल्यानंतर अखेरिस मुंबई विमानतळावर शनिवारपासून कोरोना तपासणीला सुरुवात केली जात आहे.
अशी असेल कार्यवाही
संबंधित विमान कंपनी आणि विमानातील कर्मचा-यांच्या निदर्शनास आलेल्या प्रवाशांची विमातळावर उतरल्यावर आरटीपीसीआर तपासणी केली जाईल. तपासणी केल्यानंतर अहवाल येईपर्यंत प्रवाशांना विलगीकरणाची सक्ती नसेल. प्रवासी विमानतळाबाहेर फिरण्यास मुक्त असतील, प्रवाशांना तपासणीचा डिजीटल अहवाल पाठवला जाईल. प्रवासादरम्यान, सर्व प्रवाशांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे सक्तीचे असेल, असेही विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
Join Our WhatsApp Community