महिलांच्या सुरक्षेसाठी पश्चिम व मध्य रेल्वेने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

161

मुंबईत महिला वर्ग हा नोकरीच्या ठिकाणी जाताना किंवा वैयक्तिक कामानिमित्त लोकलने प्रवास करतो. महिलांना रात्रीच्या वेळी प्रवास करताना अनेकदा समस्या निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या उद्देशाने लोकलमधील महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि टॉक बॅक यंत्रणा बसविण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

( हेही वाचा : IPL 2023 मध्ये मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या पदरी निराशा!, तर ‘हे’ खेळाडू राहिले UNSOLD)

महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व टॉक बॅक यंत्रणा 

महिलांच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास महिला रात्रीच्या वेळीही लोकलमधून सुरक्षित प्रवास करू शकतात याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यांमध्ये २११ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर मध्य रेल्वेने महिलांच्या ११४ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे महिला डब्यांवर विशेष नियंत्रण कक्षाचे लक्ष राहिल तसेच डब्यांमधील टॉक बॅक यंत्रणेमुळे महिला प्रवासी गार्ड किंवा मोटरमनशी संवाद साधू शकतात. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सध्या विना वातानुकूलित लोकलच्या १२९ महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याची व्याप्ती आणखी वाढवण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वेने सुद्धा टॉक बॅक आणि सीसीटीव्ही या दोन्ही प्रकल्पांना गती देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.