कोरोनाच्या नव्या विषाणूबाबत आता भारतात केंद्र सरकारने अलर्ट जारी केला. याबाबतीत मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी वृद्ध नागरिक, मधुमेहग्रस्त आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले. ओमायक्रॉनचा उपप्रकार असलेल्या बीएफ.७ या विषाणूचा फैलाव पटकन होत असल्याने पालिका आरोग्य विभागानेही आता रुग्ण सापडल्यास तातडीच्या उपचारांसाठी पूर्वतयारी करुन ठेवली आहे.
चीन, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि फ्रान्स या देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची वाढ दिसून येत आहे. केंद्र सरकारने २० आणि २२ डिसेंबर रोजी अद्यायावर मार्गदर्शक सूचना राज्य सरकार तसेच विमानतळ प्राधिकरणासाठी जारी केल्या. ऑक्सिजन साठ्यापासून, विभागनिहाय वॉर्डरुम तयार आहेत, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली.
रुग्णालयीन खाटांच्या सुविधा
रुग्णालये – आसनांची संख्या
- सेव्हन हिल्स – १ हजार ७००
- कस्तुरबा रुग्णालय – ३५
- कामा रुग्णालय – १००
- सेंट जॉर्ज रुग्णालय – ७०
- टाटा रुग्णालय – १६
- जगजीवन राम रुग्णालय – १२
- २६ खासगी रुग्णालये – ८७१
काय काळजी घ्याल
- सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क लावा.
- इतरांपासून सामाजिक अंतर राखा.
- साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा.
- आजारी असल्यास घरी विलगीकरणात राहा.
- वृद्ध नागरिक, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी योग्य ती खबरदारी घ्या.
- सर्व नागरिकांनी लसीकरण आणि बुस्टर डोस घ्या.