सध्या चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. त्याचबरोबर अमेरिका, जपान या देशांमध्येही कोरोना रुग्ण संख्या वाढलेली आहे. अशा परिस्थितीत भारताने आतापासूनच सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढच्या आठवड्यात थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनवरही चिंतेचे ढग जमणार का, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यासंबंधी केंद्र सरकारनेही सूचना केल्या आहेत.
कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना दिल्या
शुक्रवारी, २३ डिसेंबर रोजी सलग तिसऱ्या दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोना प्रतिबंधासाठीच्या तयारीबाबत चर्चा केली. बैठकीत मनसुख मांडविया यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आगामी सण आणि नवीन वर्षाचे उत्सव लक्षात घेऊन टेस्ट-ट्रॅक-ट्रीट आणि लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. याशिवाय मास्क लावणे, हात स्वच्छ ठेवणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. केंद्र आणि राज्यांनी सहकार्याच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे, मागच्या वेळी आलेल्या दोन लाटेत जसे काम केले, तसेच यावेळीही काम करण्याचा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.
(हेही वाचा आता राहुल शेवाळेंचा मनीषा कायंदेंवर पलटवार; ज्येष्ठ नेत्याला केले ब्लॅकमेल)
Join Our WhatsApp Community