Mumbai -Pune Express Way वर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

124

ख्रिसमसची सुट्टी आणि विकेंडमुळे मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे जाणा-या लेनवर खालापूर टोलजवळ वाहनांच्या रांगा दिसून येत आहे. त्यामुळे पुण्याला जात असाल किंवा मुंबईला येत असाल, तर वेळेचे नियोजन करुनच बाहेर पडा. कारण मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅफिकचा सामना करावा लागू शकतो.

पुण्याकडे जाणा-या मार्गावर खालापूर टोलजवळ वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत. ख्रिसमसची सुट्टी तसेच विकेंडच्या सुट्टीमुळे पु्ण्याकडे जाण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. गाड्यांची संख्या वाढल्याने खालापूर टोलवर 300 मीटरपेक्षा जास्त गर्दी दिसून येत आहे. गाड्यांची संख्या वाढल्याने खालापूर टोलवर 300 मीटरपेक्षा जास्त गर्दी दिसत आहे.

( हेही वाचा: भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात; गाडी 50 फूट खोल दरीत कोसळली )

अपेक्षेपेक्षा जास्त वाहनांची संख्या

खालापूर टोलनाक्याजवळ आणि बोरघाट येथील अमरिकांजन पुलाजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सध्या विकेंड असल्याने, एक्स्प्रेस वेवर वाहनांची संख्या अधिक आहे. अपेक्षेपेक्षा जास्त वाहनांची संख्या दिसून येत आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणा-यांचे वाहतूक कोंडीमुळे मोठे हाल होत आहेत. वाहतुकीवर नियंत्रण आणणे कठिण झाले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.