केरळ- तामिळनाडू सीमेजवळ शुक्रवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. येथली कुमिलीजवळ सबरीमाला यात्रेकरुंना घेऊन जाणारी व्हॅन उलटून आठ यात्रेकरु ठार झाले. या अपघातात अन्य दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. व्हॅन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली. सर्व यात्रेकरु मूळचे थेनी- अॅंडीपेट्टीचे रहिवासी होते आणि ते शबरीमालाला भेट देऊन परतत होते.
( हेही वाचा: HALAL: हिंदू कोळ्यांकडून मुसलमान खरेदी करत नाहीत मासे )
मंदिरातून भाविक परतताना अपघात
कुमुली टकेडीवर हा अपघात झाल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. सर्व भाविक सबरीमाला मंदिरातून परतत होते. तेवढ्यात त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात कारमधून प्रवास करणा-या आठ भाविकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना, मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. डोंगरी रस्त्याच्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे अधिका-याने सांगितले. हे सर्व लोक जिल्ह्यातील आंदिपट्टी येथील रहिवासी होते.
Join Our WhatsApp Community