रशियाला दुर्बळ करण्यासाठी युक्रेनचा वापर; पुतीन यांची अमेरिेकेवर टीका

140

युक्रेनचे युद्ध जितक्या लवकर संपेल तितके चांगले होईल, असे उद्गार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काढले आहेत. रशियाला दुर्बळ करण्यासाठी अमेरिका युक्रेनचा वापर करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ते म्हणाले की, युद्ध लवकरात लवकर संपुष्टात यावे, असेच प्रयत्न रशिया करत आहे. सर्व प्रश्नांवर तोडगा काढणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया जलदगतीने पार पडावी. यासाठी युक्रेननेदेखील प्रयत्न केले पाहिजेत. मात्र, रशियात पुतिन जोपर्यंत सत्तेवर आहेत, तोपर्यंत त्या देशाशी चर्चा करणार नाही, अशी भूमिका युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलन्सी यांनी घेतली आहे.

झेलेन्स्की यांनी अमेरिकेत केलेल्या भाषणात सांगितले की, रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. त्याबद्दल रशियावर आंतरराष्ट्रीय समुदायाने आणखी कडक निर्बंध लादणे आवश्यक आहे.

( हेही वाचा: HALAL: हिंदू कोळ्यांकडून मुसलमान खरेदी करत नाहीत मासे )

जपान चिंतेत उत्तर कोरियाने केली पुन्हा चाचणी

  • सेऊल: अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानांनी संयुक्त युद्धसराव केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाने शुक्रवारी लघुपल्ल्याच्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी केली.
  • आपली संरक्षण क्षमता वाढली आहे हे शत्रू देशांना दाखवण्यासाठी उत्तर कोरियाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे, असे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांचे मत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.