बिहारच्या मोतिहारीमध्ये रामगढवा येथील नरिलगिरी येथील वीटभट्टीच्या चिमणीत स्फोट होऊन 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली सुमारे 24 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातातील 16 जखमींवर रक्सौलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे.
( हेही वाचा : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! चीनसह ‘या’ ४ देशातून येणाऱ्या नागरिकांची RT-PCR चाचणी होणार)
घटनास्थळी मदतकार्य सुरू
यासंदर्भातील प्राथमिक माहितीनुसार या वीटभट्टीवरील स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आल्याचे आसपासच्या लोकांनी सांगितले. या अपघातानंतर एसडीआरएफची (SDRF) टीम घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी बचावकार्य सुरू केल्याचे बिहार पोलीस मुख्यालयाकडून सांगण्यात आले. या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 4 स्थानिक आणि 3 जण उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. मोतिहारी येथील वीटभट्टीवर झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे व्यथित झालो आहे. एमएनआरएफमार्फत प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत जखमींना 50 हजार रुपये देण्यात असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community