History of 25 December: WWW चा शोध कोणी लावला? जाणून घ्या सविस्तर

304

आपण सर्वजण दररोज इंटरनेटचा वापर करतो. आज संपूर्ण जग डिजीटल झाले आहे. जेव्हा कधी मनात शंका निर्माण होते तेव्हा आपण लगेच Google  सर्च करतो. इंटरनेट वापरताना, आपण एका वेबसाइटवर किंवा ब्लाॅगशी कनेक्ट होतो, जिथे आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळते. त्या वेबसाईटच्या वेबपृष्ठावर सामील होण्यापूर्वी, आपण त्याची URL पाहिली तर आपल्याला WWW दिसेल. WWW लिहिल्यानंतर, आपण वेबसाईटची URL टाकल्यावर संबंधित वेबसाईटशी कनेक्ट होण्यासाठी वर्ल्ड वाइट वेब आवश्यक आहे.

प्रत्येक वेबसाईटच्या आधी WWW असते. त्याशिवाय कोणतीही वेबसाईट पूर्ण होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का ?आपल्याला इंटरनेटशी जोडण्यासाठी ही महत्त्वाची सुविधा कोणी दिली. WWW ( वर्ल्ड वाईड वेब) चा शोध कोणी लावला ते जाणून घेऊया.

( हेही वाचा: HALAL: हिंदू कोळ्यांकडून मुसलमान खरेदी करत नाहीत मासे )

WWW चा शोध कोणी लावला?

WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेबचा शोध ब्रिटिश शास्त्रज्ञ टिम बर्नर्स ली (Tim Berners-Lee) यांनी लावला. स्वित्झर्ल्डंच्या जिनिव्हा येथे युरोपियन अणू संशोधन संस्थेत काम करताना त्यांनी 1989 मध्ये हा शोध लावला आणि त्यानंतर 25 december 1990 www वर्ल्ड वाईड वेबची यशस्वी चाचणी करण्यात आली.

टीम बर्नर्स ली कोण होते?

Tim Berners-Lee ब्रिटिश शास्त्रज्ञ असून त्यांचा जन्म 8 जून 1955 ला इंग्लंडमध्ये झाला. त्यांना सुरुवातीपासूनच काहीतरी नवीन गोष्टी करण्याची इच्छा होती. ते नवनवीन माहिती मिळवत असत. तसेच, अभ्यासातही ते अव्वल होते. त्यांचे पालक गणिततज्ज्ञ होते त्यामुळे घरचे वातावरण अभ्यासाचे होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.