India vs BAN : सामना जिंकण्यासाठी भारताला फक्त १०० धावांची गरज! तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला

151

सध्या भारत विरुद्ध बांगलादेश या संघांमध्ये कसोटी सामना सुरू आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर भारताने ४ बाद ४५ धावा केल्या आहे. आता हा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताला फक्त १०० धावांची गरज आहे. बांगलादेशकडून मेहंदी हसन मिराजने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या तर शाकीब अल हसनला १ विकेट मिळाली.

( हेही वाचा : होय, शिवसेना राष्ट्रवादीचीच..!, भास्कर जाधवांनी दिली कबुली )

बांगलादेशचा दुसरा डाव

कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर बांगलादेशचा संघ ८० धावांनी पिछाडीवर होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात बांगलादेशच्या संघाला भारताने २३१ धावांमध्ये रोखले. या दुसऱ्या कसोटीमध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. हा सामना जिंकण्यासाठी भारतापुढे १४५ धावांचे लक्ष्य होते. यातील ४५ धावा टीम इंडियाने केल्या यानंतर आता भारताला जिंकण्यासाठी फक्त १०० धावांची गरज आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताला फायदा 

यापूर्वी चितगाव कसोटीमध्ये बांगलादेशचा पराभव करत भारताने जागतिक चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताने ५५.३३ टक्के गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया आता ७५ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिका ६० टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात जर भारताने विजय मिळवला तर टीम इंडियाला मोठा फायदा होऊन जागतिक चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील स्थान पुढे जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.