महापालिकेच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या गतिमंद व विशेष मुलांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना स्पिच थेरपी व फिजीओथेरपी आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा शिकवण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमधून त्या त्या विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी होत असतानाच आता या सेवा नायर रुग्णालय अंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या अर्ली इंटरवेशन सेंटर ऑफ चिड्रेन या विभागात एकाच छताखाली देण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यामुळे विशेष शाळांमधील मुलांच्या स्पिच थेरपी व फिजिओथेरपी या नायर रुग्णालया अर्ली इंटरवेश सेंटरमध्ये केल्या जाणार आहेत.
( हेही वाचा : “तू मला शिकवू नको…” म्हणत, PMPML वाहकासोबत प्रवाशाने केले असे काही… पुण्यातील धक्कादायक प्रकार)
महापालिकेच्यावतीने २४ विभागांमध्ये विशेष मुलांसाठी १७ शाळा आहेत. या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांची प्राथमिक वैद्यकीय चाचणी वर्षांतून एकदा महापालिकेच्या शालेय आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकामार्फत करण्यात येते. या शाळांमधील मुलांची स्पीच थेरपी, फिजीओथेरपी व नाक कान घसा तज्ञ, नेत्रविकार तज्ञ व न्युरोफिजीशियन या संदर्भातील तपासणी या विशेष वैद्यकीय सेवा आहेत, ज्या केवळ रुग्णालयातच दिल्या जातात. त्यामुळे गतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या संदर्भातील तपासणीकरता महापालिकेच्या रुग्णालयातच पाठवणे संयुक्तिक ठरेल,असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
सन २०१८मध्ये तत्कालिन राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी महापालिकेच्या गतिमंद मुलांकरता चालवण्यात येणाऱ्या शाळेत विशेष तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. यावर प्रशासनाने ही मागणी संयुक्तिक नसल्याचे म्हटले होते. मात्र, या मुलांची स्थिती पाहता त्यांना रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करणे शक्य नसल्याने नगरसेवकांनी त्या त्या रुग्णालयांमधून तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतरही प्रशासनाने सर्व तज्ञ डॉक्टरांची एक समिती त्या रुगालयाच्या बाह्य विभागामार्फत त्या विशेष मुलांची आठवड्यातील शनिवारी निश्चित करून तपासणी करतील. उपनगरीय रुग्णालयांमध्ये विशेष विद्यार्थ्यांच्या तपासणीकरता स्पिच थेरपी, न्युरासर्जरी, विभाग उपलब्ध नसल्याने विशेष मुलांना वैद्यकीय तपासणीकरता महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयातच पाठवणे संयुक्तिक ठरेल,असे स्पष्ट केले होते.
परंतु यालाही नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर आता प्रशासनाने महापालिकेच्या नायर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत अर्ली इंटरवेशन सेंटर फॉर चिड्रेन सुरु करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तेथे या सर्व सेवा एका छत्राखाली उपलब्ध करण्यात येत आहे. तरी या मुलांना तेथे पाठवून त्या त्या विशेष तज्ञ डॉक्टरांकडून नियमित तपासणी व उपचार करून घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेच्या विशेष मुलांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्पिच थेरपी व फिजिओथेरपी या या नायर रुग्णालयातील या सेंटरमध्ये नेऊन केल्या जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community