शहर म्हटलं की मोठमोठ्या बिल्डिंग्स, भव्य बाजारपेठ, ट्रॅफिक, माणसांची गर्दी हे चित्र आपल्या नजरेसमोर येतं. पुणे-मुंबईत राहणार्या लोकांच्या दृष्टीकोनातून शहर पाहिलं तर ते गजबजाटीचं असतं. गावात मात्र शांतता असते. काय झाडी, काय डोंगर, काय नदी नि काय समुद्र हे गावाचं चित्र… गावाची लोकसंख्या साधारण १००० तरी असतेच. पण शहर मात्र लोकांनी भरलेलं असतं, उभं राहायला देखील जागा नसते.
( हेही वाचा : भारतीयांनी २०२२ मध्ये गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले माहिती आहे का? )
पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की जगात एक असं शहर आहे, ज्या शहराची लोकसंख्या मोजून ३० सुद्धा नाही, तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? पण हे खरंय. महत्वाचं म्हणजे हे शहर इतकं लहान आहे की या शहरात फिरण्यासाठी तुम्हाला गाडीची आवश्यकता भासत नाही. तुम्ही सहज पायी चालत या शहरात चक्कर मारु शकता. चला तर जाणून घेऊया हे गंमतीदार जगातील सर्वात लहान शहर आहे तरी कुठे
युरोपमधील क्रोएशियाची राजधानी जाग्रेबपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हे शहर वसलेलं आहे. या शहराला स्थानिक भाषेत “हम” म्हटलं जातं. काय गंमत आहे पाहा, शहर अगदी लहान, त्यात राहणारे लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतके आणि शहराचं नाव आहे “हम”. हे नाव ऐकल्यावर “हम” चित्रपतातील गाणं आठवतं. एक दुसरे से करते है प्यार हम. एक दुसरे के लिये बेकरार हम… एक दुसरे के वासते मरना पड़ा तो, है तैयार हम”. या शहराची कहाणी तशीच आहे. इथे कमी लोक असले तरी जीवाला जीव लावतात.
या शहराचा इतिहासही खूप रंजक आहे. याबद्दलचे पुरावे कोणाकडेही नसले तरी ११३२ मध्ये या शहराचा पहिला उल्लेख कागदोपत्री सापडल्याचे सांगितले जाते. त्याकाळी या शहराचे नाव चोल्म होते असे म्हणतात. प्राचीन काळी काही शासकांनी याठिकाणी दगडांनी जुन्या शैलीच्या भिंती बांधल्या होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने शहरावर सहज नजर ठेवता यावी यासाठी येथे एक टॉवरही बांधण्यात आला होता.
२०२१ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या चकित करणारी आहे. केवळ २७ लोक या शहरात राहतात. २०११ मध्ये या शहरात केवळ २१ लोक राहत होते. आता येथील लोकसंख्या वाढली आहे असे म्हणावे लागेल. तुम्हाला जर जग फिरण्याचा छंद असेल तर या वेगळ्या शहराला नक्की भेट द्या.
Join Our WhatsApp Community