सी-लिंकवरून जायचंय? भरा ‘इतका’ टोल, MMRDA कडून टोलदर जाहीर

245

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या २१. ८ किलोमीटरच्या शिवडी ते न्हावा-शेवापर्यंतच्या सी लिंकचे काम एमएमआरडीएकडून दिवस रात्र सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत हा पूल लवकर पूर्ण कऱण्याचा चंग प्राधिकरणाने बांधला आहे. दरम्यान, या पुलावरून प्रवास करण्यासाठी वाहनधारकांकडून दोन टप्प्यात टोल आकारण्यात येणार आहे. कारसाठी २४० रूपये तर मल्टी अॅक्सल वाहनांसाठी ७८० रूपये टोल असणार आहे.

(हेही वाचा – आदेश बांदेकर अडचणीत! अर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?)

एमएमआरडीएने या पुलाच्या तिमाही अहवालात अशी माहिती दिली की, टोलसाठी पहिला टप्पा शिवडी ते शिवाजीनगर तर दुसरा टप्पा शिवाजी नगर ते चिर्ले जंक्शन असा असणार आहे. या पुलावरून २०२२ मध्ये ३९ हजार ३०० वाहने तर २०४२ पर्यंत ५५ हजार वाहने दररोज धावतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर शिवडी-न्हावा-शेवा सी लिंक झाल्यानंतर सध्याच्या वाशी खाडी पुलावरील मोठा भार कमी होणार आहे.

प्रत्येक किमीवर सीसीटीव्ही

सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक किमी अंतरावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. रोख आणि आटोमॅटिक दोन्ही पद्धतीने टोल वसूल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी डिस्प्ले बोर्ड लावण्यात येणार असून ते एका ऑप्टिकल फायबर केबलद्वारे नियंत्रण कक्षास जोडण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.