ई-सिम म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या फायदे

163

सध्या स्मार्टफोन उत्पादक ई-सिम स्वीकारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे काही वर्षांपूर्वी भविष्यातील तंत्रज्ञान मानले जाणारे ई-सिम आता मुख्य प्रवाहात येत असल्याने भारतासारख्या देशातही काही कंपन्या ई-सिम सेवा पुरवत आहेत. हे एम्बेडेड सिम ग्राहकांना ओळखण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी वापरण्यात येणारी माहिती संग्रहित करते. हे सिम फोनमधून काढले जाऊ शकत नाही. ई-सिम बदलण्यासाठी सिम ट्रे उघडण्याची गरज नाही. त्याऐवजी नेटवर्क पुरवठादाराला फोन करावा लागेल, क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.

eSIM म्हणजे काय?

ई-सिम चे पूर्ण फॉर्म एम्बेडेड सब्सक्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल आहे जे तुमच्या फोन, स्मार्टवॉच किंवा टॅबलेटमध्ये एम्बेड केलेले आहे. वास्तविक, इतर सिम कार्डांप्रमाणे फोनमध्ये ई-सिम घालता येत नाही. फोनची निर्मिती करतानाच कंपनी ई-सिम तयार करते. हे सिम फोनच्या हार्डवेअरमध्येच येते. यामुळे फोनची जागा वाचते तसेच वेगळा सिम ट्रे बनवण्याची गरज भासत नाही. दरम्यान, आजकाल अनेक फोनमध्ये अशा ई-सिमचा ट्रेंड सुरू आहे.

(हेही वाचा – दाऊद आणि पाकिस्तानमधील गँगशी ‘त्या’ महिलेचे संबंध, NIA कडून तपास करा; राहुल शेवाळेंचे स्पष्टीकरण)

हे आहेत ई-सिमचे फायदे

  1. ऑपरेटर बदलता तेव्हा सिम कार्ड बदलण्याची गरज नाही
  2. एका ई-सिमवर अन्य व्हर्च्युअल सिम कार्ड साठवता येतात
  3. एका नेटवर्कवर समस्या असल्यास दुसरे नेटवर्क स्वीच करणे सोयिस्कर होते
  4. डिव्हाइस चोरी गेला तर गुन्हेगाराला तुमचे सिम काढणे कठीण होईल, या उलट त्याला ट्रॅक करणे सोपे होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.