गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बंडानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. शिवसेनेचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काही आमदारांसह बंडखोरी करत थेट पक्षाला आणि पक्षप्रमुखांनाच आव्हान करत बंड केले. एकनाथ शिंदेंनी बंड पुकारत भाजपसह जात राज्यात नवं सरकार स्थापन केले. त्यानंतर या बंडासंदर्भात अनेक खुलासे झाले. दरम्यान एकनाथ शिंदेंनी हा बंड का केला? या बंडाची बीजं नेमकी कोणी पेरली यासंदर्भात आता शिंदे गटातील एका माजी आमदारानाचे मोठा गौप्यस्फोट केला आहे.
(हेही वाचा – दाऊद आणि पाकिस्तानमधील गँगशी ‘त्या’ महिलेचे संबंध, NIA कडून तपास करा; राहुल शेवाळेंचे स्पष्टीकरण)
विजय शिवतारे यांनी माध्यमांशी बोलताना सत्तासंघर्षावर भाष्य केले आहे. मीच बंडाची बीजं एकनाथ शिंदेंच्या मनात पेरली असा दावा माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच ठरवली होती, असाही गौप्यस्फोट विजय शिवतारेंनी केला आहे. इतकेच नाही तर महाविकास आघाडी सरकार आम्हाला मान्यच नव्हतं, असा दावा शिवतारे यांनी केला आहे.
काय म्हणाले शिवतारे?
राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं ते महाराष्ट्राच्या हिताचे नव्हते. पहिल्या दोन महिन्यातच मी आघाडी सरकारच्या विरोधात उचल खाल्ली होती. महाविकास आघाडी सरकार आल्यानतंर दोन महिन्यानंतरच मी नंदनवनला गेलो. तेथे एकनाथ शिंदेंच्या साडेचार तास चर्चा केली आणि त्यांच्या मनात उठावाची बीज पेरले, असा गौप्यस्फोट विजय शिवतरे यांनी केला. साडे चार तास चर्चा करताना मी शिंदेंना सांगितले हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही, तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा. भाजप सेनेचे सरकार आलं पाहिजे, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी आपल्या ७० सीट घालवल्या. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मतदारसंघात माणसं कामाला लावली. त्यामुळे भाजपनेही शिवसेनेचे मंत्री पाडले. हे सर्व उद्धव ठाकरे यांच्यामुळेच झाले. निवडणुकीपू्र्वी उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीशी सेटलमेंट झाली होती. कोणत्या सीट पाडायच्या, कोणत्या विजयी करायच्या आणि आकडेवारी कशी जुळवून आणायची हे कट कारस्थान निवडणुकीपू्र्वीच झाले होते. महाविकास आघाडी नंतर झाली नाही, ती आधीच झाली होती. हे फसवत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
Join Our WhatsApp Community