PM Modi Mann Ki Baat: जागतिक यशाचे श्रेय दिले देशवासियांना, म्हणाले…

152

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा 2022 या वर्षातील शेवटचा म्हणजेच, 96वा एपिसोड झाला. सुरुवातीला पंतप्रधान मोदी भारताच्या प्रगतीबद्दल बोलले आणि G-20 गटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल अभिमानही व्यक्त केला. गेल्या काही वर्षांत आपण आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या आव्हानांवर मात केली. याचे संपूर्ण श्रेय आपले वैद्यकीय तज्ञ, शास्त्रज्ञ आणि देशवासीयांच्या इच्छाशक्तीला जाते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

2022 हे वर्ष अनेक प्रकारे खूप प्रेरणादायी, आश्चर्यकारक ठरले आहे. यावर्षी भारताने आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण केली आणि यावर्षी अमृतकाळ सुरू झाला. यावर्षी देशाला नवी गती मिळाली, सर्व देशवासियांनी अनेक खास गोष्टी केल्या. ऑगस्ट महिन्यातील ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहीम कोण विसरू शकेल. हाच तो क्षण होता, जेव्हा देशातील प्रत्येक घरात देशाचा तिरंगा डौलानं फडकत होता. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या या मोहीमेत संपूर्ण देश तिरंगामय झाला होता. 60 दशलक्षाहून अधिक लोकांनी तिरंग्यासोबत सेल्फी पाठवले. स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव पुढील वर्षीही असाच सुरू राहील आणि अमृतकाळाचा पाया आणखी मजबूत करेल’, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

(हेही वाचा 2,50,000 नागरिकांना गिळंकृत करणारी ख्रिसमसनंतरची ‘ती’ काळरात्र)

सावधानता बाळगा! 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना कोरोनाबाबत सावध केले. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना वाढत असल्याचेही तुम्ही पाहत आहात. म्हणूनच मास्क आणि हात धुणे यासारख्या खबरदारीची अधिक काळजी घेतली पाहिजे. आपण सावध राहिलो तर आपणही सुरक्षित राहू आणि आपल्या आनंदात कोणताही अडथळा येणार नाही. गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या जागतिक आयुर्वेद परिषदे सहभागी झालो होतो. यामध्ये 40 हून अधिक देशांचे प्रतिनिधी आले होते. यामध्ये 550 हून अधिक शोधनिबंध सादर करण्यात आले. या जागतिक महामारीच्या काळात आपण सर्वजण ज्या प्रकारे योग आणि आयुर्वेदाचे सामर्थ्य पाहत आहोत. त्याबाबतचे प्रामाणिक संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

G-20 च्या जबाबदारीबद्दल अभिमान व्यक्त

G-20 वर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावर्षी भारताला G-20 गटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे. 2023 मध्ये आपल्याला G-20 च्या उत्साहाला एका नव्या उंचीवर नेऊन या कार्यक्रमाला जनआंदोलन बनवायचे आहे. आज जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. येशू ख्रिस्तांचे जीवन आणि शिकवण लक्षात ठेवण्याचा हा दिवस. नाताळच्या खूप खूप शुभेच्छा देतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.