दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे न्यायालयात जाणार?

132

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांमुळे बदनामीबद्दल न्यायालयात जाण्याचा विचार ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे करत आहेत. याप्रकरणी त्यांना तुरुंगात पाठवण्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे.

सालियनप्रकरणी तपास करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष चौकशी पथक स्थापन करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यासह काही नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन मृत्युप्रकरणी आरोप केले आहेत. त्यांच्या नार्को चाचणीची मागणीदेखील केली आहे. शेवाळे यांनी रिया चक्रवर्तीला एयू नावाने आलेले अनेक फोन हे एयू म्हणजे आदित्य ठाकरे असल्याचा आरोप केला आहे.

( हेही वाचा: धर्मांध तबलीगींचे हिंदूविरोधी कारस्थान )

नागपूरमध्ये  मोठा गौप्यस्फोट करणार

ठाकरे गटातील नेत्यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिले असले तरी अब्रुनुकसानीबद्दल न्यायालयात दावा दाखल करता येईल का किंवा एसआयटी चौकशी सह अन्य मुद्यांवर न्यायालयात जाता येईल का, याबाबत आदित्य ठाकरे कायदेशीर सल्ला घेत असल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटही आक्रमक झाला असून, मु्ख्यमंत्री व राज्य सरकार विरोधात नागपूरमध्ये सोमवारी मोठा गौप्यस्फोट करण्याचे प्रत्यूत्तर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्याप्रकरणी त्यांच्या डायरीतील सांकेतिक नावांची चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.