2022 हे वर्ष आता काही दिवसांतच संपणार आहे. याच निमित्ताने भारतीय फलंदाजांनी 2022 या वर्षात केलेल्या धावांबाबत माहिती समोर आली आहे. नुकतीच भारताने बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 2.0 अशा फरकाने खिशात घातली. त्यानंतर आता वर्षभरात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 फलंदाज कोण होते आणि त्यांनी किती धावा केल्या आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
समोर आलेल्या माहितीनुसार, विराट, रोहित वा सुर्या नाही तर श्रेयस अय्यर याने 2022 या वर्षात सर्वाधिक धावा केल्या आहेत.
श्रेयस अय्यर- 1 हजार 609 धावा
मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने 2022 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा केल्या. अय्यरने 39 सामन्यांच्या 40 डावांमध्ये 48.75 च्या सरासरीने 1 हजार 609 धावा केल्या. यामध्ये 14 अर्धशतकांचा समावेश आहे.
सुर्यकुमार यादव- 1 हजार 424 धावा
सुर्यकुमार यादवसाठी 2022 वर्ष संस्मरणीय ठरले. त्याने केवळ टी-20 सामन्यांमध्ये 1 हजार 164 पेक्षा जास्त धावा केल्या. त्याने यावर्षी भारतासाठी 43 डावांत 1 हजार 424 धावा केल्या.
ऋषभ पंत- 1 हजार 380 धावा
काही सामने वगळता यष्टीरक्षक फलंदाज ऋषभने मर्यादित षटकांच्या मालिकेत फारशी कामगिरी केली नाही. सर्वाधिक धावा करणा-या भारतीय फलंदाजांमध्ये तो तिस-या क्रमांकावर राहिला आहे. पंतने 43 डावांत 37 च्या सरासरीने 1 हजार 380 धावा केल्या आहेत.
( हेही वाचा: विराट कोहली बांगलादेशच्या खेळाडूवर मैदानातच भडकला, काय आहे कारण? )
विराट कोहली- 1 हजार 348 धावा
विराट कोहलीने यावर्षी दोन आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. दोन वर्षांपासून शतकाची वाट पाहणा-या कोहलीने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यात त्याने शतक झळकावले.
रोहित शर्मा- 995 धावा
कर्णाधार रोहित शर्माने 39 सामन्यांच्या 40 डावांत 995 धावा केल्या आहेत. त्यात 6 अर्धशतकांचा समावेश होता. रोहितने नाबाद 76 धावांची मोठी खेळी यावर्षात केली आहे.
Join Our WhatsApp Community