व्हिडिओकाॅन कंपनीचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थातच सीबीआयने अटक केली आहे. आयसीआयसीआय बॅंक व्हिडिओकाॅन मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात ही अटक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात ICICI बॅंकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना आधीच अटक झाली आहे. त्यानंतर आता वेणूगोपाल धूत यांनाही सीबीआयने ताब्यात घेतले आहे.
( हेही वाचा: ‘तुनिषा शर्माचा मृत्यू, हा लव्ह जिहाद’च ‘या’ भाजप नेत्याने केला दावा )
सीबीआय न्यायालयात करणार हजर
ICICI बॅंकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्यानंतर वेणूगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे. सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानातून धूत यांना अटक करण्यात आली. धूत यांना थोड्याच वेळात विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार आहे. सीबीआय कोठडीत असलेले चंदा कोचर आणि दीपक कोचर यांची रिमांड सोमवारी संपणार आहे. त्यांनाही सीबीआय सोमवारी न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. आयसीआयसीआय बॅंक कर्ज घोटाळा प्रकरणात तिन्ही आरोपींना एकत्रपणे हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community