चीन- पाक सीमेवर ‘प्रलय’; भारताने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

147

पूर्व लडाखमधील गलवान खो-यात आणि अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चिनी सैन्यासोबत भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीमुळे भारताला सीमा सुरक्षेसाठी मोठी पावले उचलावी लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भारताकडून पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर ‘प्रलय’ हे शक्तिशाली बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे. हे क्षेपणास्त्र चीन आणि पाकिस्तानच्या भारतीय सीमेवर तैनात केले जाईल. दरम्यान, चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकार सातत्याने आपली लष्करी ताकद वाढवत आहे.

120 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे भारतात येणार

चीनसोबतचा सीमावाद आणि पाकिस्तानसोबतचे तणावपूर्ण संबंध असताना, केंद्र सरकारने प्रलय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र खरेदीचा मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाने भारतीय शास्त्रज्ञ दलांसाठी सुमारे 120 प्रलय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. ही क्षेपणास्त्र चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहेत.

( हेही वाचा: चीनचा साम्राज्यवाद आणि भारताची युद्धसज्जता )

काय आहे प्रलय क्षेपणास्त्र?

प्रलय हे साॅलिड प्रोपेलंट राॅकेट मोटर आणि इतर नवीन तंत्रज्ञानावर चालणारे क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्र प्रणालीचा विकास 2015 च्या आसपास सुरु झाला. अशा क्षमतेच्या विकासास दिवंगत जनरल बिपिन रावत यांनी लष्करप्रमुख म्हणून प्रोत्साहन दिले होते. या क्षेपणास्त्राची गेल्या वर्षी 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला दोनदा यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.