सध्या चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे, त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांनाही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारनेही त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून इथे सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे.
कुठे कुठे केली मास्क सक्ती?
वर्षाअखेर आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक गर्दी करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. घाबरुन जाऊ नका, कोरोनाच्या नियमांचे पालन करा, असे कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. कर्नाटकमध्ये आता सिनेमागृह, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. तसंच पब, हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमध्ये मास्क अनिवार्य केला आहे. त्याचबरोबर नवीन वर्षाचे स्वागत मध्यरात्री एक वाजेपर्यंत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशात आज 196 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर मागील 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असली तरी खबरदारी घेतली जात आहे. 27 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व आरोग्य सुविधांच्या पडताळणीसाठी मॉक ड्रील आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(हेही वाचा तुनिषाला झीशानने ‘वापरले’; आईचा गंभीर आरोप )
Join Our WhatsApp Community