अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या शव विच्छेदनाच्या वेळी उपस्थित कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याने सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे, असा खळबळजनक दावा केला आहे.
काय म्हणाले शाह?
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. रुपकुमार शाह असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हत्या आणि आत्महत्या यात खूप फरक आहे. मृतदेह जेव्हा येतो तेव्हा ही हत्या की आत्महत्या हे लगेच कळते. सुशांतच्या मानेवर खुनाच्या खुणा होत्या, ते खुनासारखे दिसत होते. शरीरावर वार आणि जखमेच्या खुणा होत्या. आत्महत्या करणार्या व्यक्तीला ठोसे मारले जात नाहीत, असे शाह म्हणाले. राजपूतने आत्महत्या केल्याच्या दाव्यावर शंका व्यक्त करताना शाह म्हणाले, सुशांत एक उत्तम अभिनेता होता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून अशा व्यक्तीने आत्महत्या केली तर आम्ही त्याचे मृतदेह व्यवस्थित हाताळू. हातपाय तुटलेला माणूस स्वतःला कसा लटकवू शकतो? यावरून मी आमच्या वरिष्ठांना ही आत्महत्या नसून हत्या आहे, असे दिसत असल्याचे सांगितले, मात्र त्यावेळी वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असेही शाह म्हणाले.
(हेही वाचा तुनिषाला झीशानने ‘वापरले’; आईचा गंभीर आरोप )