शिंदे गटाचा ‘हा’ नेता लढवणार नाही 2024 ची निवडणूक; गोपीचंद पडळकरांचा गौप्यस्फोट

147

मी 2019 ला बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत होतो. त्यावेळी आमदार बाबर आणि त्यांचे पुत्र अमोल बाबर यांनी बारामतीच्या क्लब हाऊसमधील पहाटेच्या बैठकीत मला 2024 ला तुमच्या पाठीशी उभे राहत असल्याचा शब्द दिला होता. तो शब्द आता ते पिता-पुत्र पाळतील. त्यामुळे बाबर हे खानापूर मतदारसंघात 2024 ची निवडणूक लढवणार नाहीत, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

खानापूर- आटपाडीत 2024 मध्ये भाजपचा आमदार असेल. आमदार अनिल बाबर 2024 मध्ये निवडणूक लढवणार नाहीत, असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर आटपाडीमध्ये आता भाजपचा आमदार असेल असा गौप्यस्फोट केला आहे. खानापूर तालुक्यातील मोही येथील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभासाठी पडळकर बोलत होते. गोपीचंद पडळकर हे कायम वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात.

कोण आहेत अनिल बाबर?

अनिल बाबर हे शिवसेनेचे आमदार होते. एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर अनिल बाबर हे 40 आमदारांसोबत गुवाहटीला गेले. बाबर सध्या खानापूर- आटपाडी मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनित्व करतात. बाळासाहेबांची शिवसेना पक्षात अनिल बाबर सध्या आहेत. अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर हेही राजकारणात सक्रिय आहेत. पडळकरांच्या या वक्तव्यानंतर अनिल बाबर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.